मिनिमलिझम आणि ब्रुटलिझमचा संगम

हा बंगला म्हणजे ‘ब्रूटल-मिनिमलिझम या संकल्पनेचा एक उत्कृष्ट अभ्यास आहे. या बंगल्याच्या रचनेत कच्च्या सिमेंटचा  आणि टेराकोटा विटांचा वापर केला आहे.

या विशिष्ट सामग्रीतून  स्पष्टता आणि गहन शांतता  देणारी जागा यशस्वीपणे उभी केली आहे. जेव्हा आपण या दोन शैली एकत्र आणतो, तेव्हा एक अप्रतिम कलाकृती उभी राहते. ब्रुटालीझम बंगल्याला त्याचे कच्चे, ठोस मूळ देते, तर मिनिमलिझम त्या जागेला राहण्यासाठी सौंदर्यपूर्ण आणि सुव्यवस्थित बनवते. या घरात प्रत्येक वस्तू एक निश्चित उद्देश पूर्ण करते.