आर्किटेक्ट आणि सिविल इंजिनिर्स यांच्या दृष्टीकोनातून तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी

भारतातील बांधकाम उद्योग कोणत्या तांत्रिक अडचणींचा सामना करतो आहे?

A)प्रोजेक्ट टाइमलाइनमध्ये विलंब (Project Timeline): निकृष्ठ मनुष्य बळ व्यवस्थापन, साइट कंडीशन, अप्रत्याशित बांधकाम मंजुरी प्रक्रियेमध्ये येणाऱ्याअडचणी आणि हळू प्रक्रिया.यामुळे प्रकल्पवेळेवर पूर्ण होणे कठीण होते.

B)इन्फ्रास्ट्रक्चर (Infrastructure): आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता, वाहतूक, वीज, पाणी किंवा साइट पर्यंतच्या रस्त्यांची समस्या प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच अडथळे निर्माण करतात.

C)तंत्रज्ञानाचा स्वीकार (Technology Adoption): BIM, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर किंवा प्रीफॅब्रिकेशन यांसारख्या आधुनिक तंत्रांचा वापर अजूनही काही ठराविक ठिकाणीच मर्यादितआहे.

भारतातील बांधकाम क्षेत्रातील कायदेशीर अडचणी कोणत्या आहेत?

नियमन (Regulation) लोकसंख्या, विविधता आणि जीवनशैलीतील बदलांमुळे भारतातील प्रत्येक राज्य व शहरांचे रेगुलेशन भिन्न असते, म्हणूनच बांधकाम मंजुरी प्रक्रियेत विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यूझीलंडच्या बांधकाम उद्योगात कोणत्या प्रकारच्या तांत्रिक अडचणी अनुभवायला मिळतात?

खर्चाचा अंदाज लावणे आव्हानात्मक ठरते, कारण पुरवठा साखळीतील चढ-उतारांमुळे साहित्याच्या किमती स्थिर राहत नाहीत. त्यामुळे अचूक कोटेशन देणे धोकादायक होऊ शकते. याशिवाय, साहित्याची डिलिव्हरी आणि कामगारांची उपलब्धता यामध्येही सतत बदल होत राहतात.

न्यूझीलंडच्या बांधकाम क्षेत्रात कोणत्या प्रकारच्या कायदेशीर अडचणी उद्भवतात?

बांधकाम प्रक्रिया अनेक वेळा लांब आणि कठोर असते, ज्यामुळे प्रकल्पांची गती कमी होते आणि खर्च वाढण्याची शक्यता वाढते. विविध जिल्हा परिषदांकडून बांधकाम संहितेचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावले जातात, त्यामुळे एका जिल्ह्यात मंजूर झालेली योजना दुसऱ्या जिल्ह्यात अनिवार्यपणे मंजूर होईलच असे नसते.

या तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत कोणते उपाय केले आहेत?

बांधकाम साहित्याची किंमत आणि उपलब्धता स्थिर राहावी म्हणून आम्ही साहित्याची ऑर्डर प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच देतो, त्यामुळे आवश्यकतेच्या वेळी ते वेळेत उपलब्ध राहते. तसेच, कौन्सिलशी अनावश्यक दीर्घ चर्चेला सामोरे जावे लागू नये म्हणून आम्ही आमची सर्व सबमिशन्स पूर्ण तयारीनिशी आणि नीटनेटकेपणाने सादर करतो.