A render of an elegant Greek Doric style villa

डोराइक सौंदर्याची समकालीन पुनर्रचना

हा व्हिला प्रकल्प म्हणजे प्राचीन ग्रीक डोराइक शैलीच्या (Doric Style) मूळ तत्त्वांना — म्हणजे मजबूत साधेपणा (Strength, Simplicity) आणि प्रमाणबद्धता (Proportion), आधुनिक लक्झरी डिझाइनमध्ये दिलेली एक अनोखी कलाटणी आहे. वास्तुशिल्पातील भव्यता टिकवून ठेवताना ती वास्तू राहण्यासाठी आरामदायक असावी, हे मोठे आव्हान होते. त्यावर, डोराइक स्तंभांचे (Columns) प्रचंड स्वरूप कायम ठेवून, त्यांच्या जोडीला काचेच्या मोठ्या पॅनल्सचा (Glass Panels) आणि खुल्या जागांचा वापर करून तोल साधण्यात आला. यामुळे वास्तूला शास्त्रीय मजबुती मिळाली, पण ती बंदिस्त न वाटता मोकळी व आधुनिक वाटू लागली. या व्हिलाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे भव्य स्तंभांचे प्रवेशद्वार आणि मध्यभागी असलेला प्रमाणबद्धतेचा हॉल. डिझाइनला भारतीय आणि न्यूझीलंडच्या नैसर्गिक संसाधनांची जोड देण्यात आली आहे,भारतीय आणि न्यूझीलंड या दोन संस्कृतींच्या मिश्रणातून या व्हिलाला एक चिरंतन आणि तरीही समकालीन ओळख मिळाली आहे.